मोठी अपडेट ! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी ”या” नावाची चर्चा ?
विधासभा निवडणुकीत महायुती सरकरने ऐतिहासिक विजय मिळविला असून महाविकस आघाडीला मात्र दारुण पराभव सहन करावा लागला आहे. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीतनंतर .काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला असून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, आता याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेस हायकमांडकडून प्रदेशाध्य पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या दिशेने रवाना देखील झाले आहेत.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तात्काळ बोलावण्यात आलं आहे, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसकडून याची दखल घेतण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.