महाराष्ट्र राज्य शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या सदस्य पदासाठी संजय घोडके यांच्या नावाची चर्चा

Connect With Us

उस्मानाबाद : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ सदस्य पदासाठी तुळजापूर तालुक्यातील मौजे लोहगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मा. यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय घोडके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. संजय घोडके हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध आंदोलांनातून त्यांनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली . वंचित व गरीब लोकांना ते नेहमीच मदतीचा हात देतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्या कु.सक्षणाताई सलगर यांच्या मार्फत मुंबई येथे खा.सुप्रियाताई सुळे व प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जयंत पाटील साहेब यांची भेट घेऊन संजय घोडके यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्या समोर मांडला आहे. त्याची निवड करण्याकरता  सुरेश  बिराजदार,जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उस्मानाबाद व सक्षणाताई सलगर, प्रदेश अध्यक्षा युवती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  यांनी शिफारस ही केलीली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय घोडके यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ सदस्य पदी निवड झाली तर निश्चित च सर्व सामान्यांना न्याय मिळेल अशी समाज बांधवातुन चर्चा होत असल्याचे दिसुन येत आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us