गणपती विसजर्नासाठी येणाऱ्या भाविकांची होणार अँटिजन चाचणी; ठाणे महापालिका आयुक्तांची माहिती
ठाणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणोशोत्सव काळात विसजर्नाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची अँटिजन चाचणी केली जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून या ठिकाणी भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ५० हजार अँन्टीजन किट तयार ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणार्या भाविकांची अँन्टीजन चाचणी करणो महत्त्वाचे आहे. ठाणो महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून या ठिकाणी भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ५० हजार अँन्टीजन किट तयार ठेवण्यात येणार आहेत.
श्री गणोश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने पारिसक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी(चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल(निसर्ग उद्यान), कळवा(ठाणे बाजू), बाळकूम घाट आण िदिवा घाट असे एकूण ७ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. तसेच, श्री गणोश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने कृत्रिम तलावांची ही निर्मिती करण्यात आली आहे.
दरम्यान, या ठिकाणी छोटया गणोश मुर्तींबरोबर मोठया आकाराच्या गणोश मुर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणोश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, गणोश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अिग्नशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आण िप्रसाधनगृह अशी यंत्नणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/