CoronaVirus : राज्यात नव्या रुग्णसंख्येत घट, जाणून घ्या रिकव्हरी रेट
मुंबई : राज्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असून रुग्ण बरे होण्याचं प्रमण ९६.५४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात आज १२ हजार ६४५ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० लाख ५८ हजार ७५१ वर पोहोचला आहे. तर आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या कमी होती. राज्यात ६ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण ८२,०८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
#CoronavirusUpdates
२७ जुलै, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ३४३
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ४६६
बरे झालेले एकूण रुग्ण – ७११३१५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%एकूण सक्रिय रुग्ण- ५२६७
दुप्पटीचा दर- १३७७ दिवस
कोविड वाढीचा दर (२० जुलै ते २६ जुलै)- ०.०५% #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 27, 2021