भारत बायोटेकच्या इंट्रानेझल बूस्टर डोसच्या ट्रायलला DCGI ची परवानगी

Connect With Us

नवी दिल्ली  : भारत बायोटेकच्या इंट्रानेझल बूस्टर डोसच्या चाचण्यांसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने परवानगी दिली आहे. या मंजुरीसाठी DCGI ने कंपनीला तीन आठवड्यांपूर्वीच प्रोटोकॉल सादर करण्यास सांगितले होते.तिसऱ्या डोसच्या फेज III चाचणीसाठी अर्ज सादर करणारी भारत बायोटेक ही दुसरी कंपनी आहे.  देशभरात 9 वेगवेगळ्या ठिकाणी या चाचण्या केल्या जातील.

भारतात पहिल्यांदाच नाकाद्वारे बूस्टर डोस दिला जातोय. इंट्रानेझल लसीमध्ये ओमायक्रॉनसह कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांचा प्रसार रोखण्याची क्षमता असल्याचा कंपनीचा दावा आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी सांगितले की, DCGI ने काही अटींच्या अधीन राहून प्रौढ लोकांमध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या विक्रीला परवानगी दिली आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us