राष्ट्रीय समाज पक्षाच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी दत्तात्रेय मेहेत्रे यांची निवड
राष्ट्रीय समाज पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी दत्तात्रेय मेहेत्रे यांची निवड करण्यात आली. मेहेत्रेंनी भाजपाला राम राम करत रासप मध्ये प्रवेश केला . मेहेत्रे यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील सामाजिक काम बघता त्यांच्या खांद्यावर थेट जिल्हाध्यक्ष पदाची जबादारी टाकण्यात आली. या निवडीने रासपची औरंगाबाद जिल्ह्यात ताकद निश्चितच वाढेल अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते प्रा.भास्कर टेकाळे यांनी व्यक्त केली. यावेळी नियुक्ती पत्र देताना रासपचे प्रदेश प्रवक्ते प्रा.भास्कर टेकाळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुरेश कटारे, युवक जिल्हाध्यक्ष दिलीप रिठे, तालुका अध्यक्ष रमेश काटकर व पदअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय देणाचा प्रयत्न करू
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर , प्रदेश अध्यक्ष रत्नाकर गुट्टे , प्रदेश महासचिव बाळासाहेब दोडतले तसेच प्रदेश प्रवक्ते भास्कर टेकाळे यांनी आपल्यावर विश्वास दाखवून मोठी जबादारी दिली त्याबद्दल त्यांचे मनापसून आभार व्यक्त करतो . पक्षाने दिलेली जबादारी प्रामाणिकपणे निभावू तसेच जनसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू.
– दत्तात्रेय मेहेत्रे , नूतन औरंगाबाद जिल्ह्याध्यक्ष , रासप
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/