CoronaUpdates : गेल्या २४ तासांत आढळले ४२,९८२ रुग्ण, ५३३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : मागे काही दिवसाआधी करोना ची लाट ओसरल्याचे काहीसे चिन्ह दिसत होते तोच पुन्हा एकदा हा ओघ वाढू लागला आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांमध्ये करोना संसर्गाचे ४२,९८२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४१,७२६ संक्रमित रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. त्याच वेळी, ५३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ४,११,०७६ झाली आहे, ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात ३,१८,१२,११४ करोना रुग्ण आढळले. त्यापैकी ३,०९,७४,७४८ करोना बाधितांनी करोनावर मात केली आहे. तर ४,२६,२९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7