NashikUnlock; उद्यापासून पासून नाशकातले कोरोना निर्बंध शिथिल
नाशिक : गेल्या वर्षी पासुन कोरोनाने हाहाकार घातला आहे, त्यामुळे जनतेला बरेच निंर्बध सहन करावे लागले. अनेकांना दंंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले. दरम्यान, आताते सर्व निंर्बंध १५ ऑगस्ट पासुन शिथील होत आहे. विशेष म्हणजे वीकेण्ड लॉकडाऊन संपूर्ण हटवण्यात आल्यानं रविवारसह सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान आस्थापना खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. फक्त शाळा महाविद्यालये, मंंदिरे, धार्मिक स्थळे व नाट्यगृह, सिनेेमागृहांवरच बंदी राहणार आहे.
वाचा काय सुरू राहणार
- सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू
- हॉटेल, रेस्टॉरंट 50 % क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी
- दुकान, मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणार्यांचे लसीकरण आवश्यक.
- शॉपिंग मॉल्समध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश
- मंगल कार्यालयांना 50 % क्षमतेत जास्तीत जास्त 100 नागरिकांच्या उपस्थितीला
वाचा काय बंद राहणार
- सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील)
- धार्मिक स्थळे
- शाळा, महाविद्यालये
- कोचिंग क्लासेस
तसेच, खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांच्या उपस्थितीस मुभा खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या 24 तास सुरू ठेवता येणार, बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी असेल आणि जिम्नॅशियम, योगसेंटर, सलून आणि स्पा 50 % क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/