राज्यात हुडहुडी ! पुढील 3 ते 4 दिवस गारठा कायम

Connect With Us

नाशिक:  राज्यभरात थंडीचा परिणाम दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबईत 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे.

शनिवारी आणि रविवारी राज्यात अवकाळी पावसामुळे राज्यभरातली तापमानात मोठी घसरण झाली. मुंबईतही अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे मुंबईतल्या तापमानातही मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. शहरातल्या अनेक भागात किमान तापमान 16 अंशांवर पोहोचलं. येत्या एक ते दोन दिवसांत मुंबईत थंडीचा प्रभाव असणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुणेसह महाराष्ट्रात काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळल्या.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 

 


Connect With Us