अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून होणार घरातच लसीकरण
मुंबई : आजारपणाने म्हणजेच शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून असलेल्या नागरिकांना ३० जुलैपासून त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रयोग जोगेश्वरी, अंधेरी पूर्व या विभागात केला जाणार आहे. आतापर्यंत चार हजार ४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे नाव नोंदविले आहे. बिगर शासकीय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे लसीकरण केले जाणार आहे.
राज्य शासनाने संपूर्ण राज्यात स्थानिक प्राधिकरणांना या संदर्भात नागरिकांकडून माहिती संकलित करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंथरुणाला खिळून असणाऱ्या व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण अशी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली होती. आतापर्यंत अशा ४४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे संपूर्ण साधला आहे.