श्रावण आणि गणेशोत्सव संपताच चिकन आणि अंडी महागली !
मुंबई: श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच चिकन आणि अंड्यांचे भाव वाढले आहेत. श्रावान आणि गणेशोत्सव संपताच खवय्यांनी मांसाहार वर चांगलाच ताव मारायला सुरुवात केलीय, तोच या किमतीत वाढ झाल्याचे समजतेय.
तसेच, सोयाबीन आणि मका महागल्याने मासांहार सेवनाकडे वळल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. चिकनच्या दरात 10 तर अंडी एक रुपयांनी महागले आहे. ब्रॉयलर आणि गावठी कोंबडीच्या दरात प्रति किलोमागे 10 रुपयांनी तर, अंड्याच्या दरात प्रति नग 1 रुपयाने वाढ झाली आहे.
ब्रॉयलर कोंबडी आधी 120 रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी 430 रुपये प्रति किलोने आणि अंडी प्रति नग पाच रुपये दराने विक्री केले जात होते. आता ब्रॉयलर कोंबडी 140 ते 150 रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी 440 ते 460 रुपये प्रति किलोने तसेच अंडी प्रति नग 6 रुपये दराने विक्री केले जात आहेत.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/