राज्यात पुढचे 2 महिने जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
मुंबई: हवामान खात्याकडून राज्यातील मान्सून अंदाज वर्तवण्यात आला असून पुढील दोन महिने म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान देशात 95 ते 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.ऑगस्टमध्ये संपूर्ण देशात 94 ते 106 टक्के इतक्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, पुढील दोन महिन्यांचा एकत्रित विचार केला असता, राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (More than average) कोसळण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अजूनही अपेक्षित पावसानं हजेरी लावली नाही. पण पुढील दोन महिन्यात याठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7