‘या’ व्यक्तीने स्वतःला अफगाणिस्तानाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष घोषित केलं!
तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानावर कब्जा केला आहे, त्या भीतीपोटी तेथील नागरिक देशातून पळ काढत आहे, याच दरम्यान, सध्या अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे दुसऱ्या देशात पळून गेलेले आहेत. अशावेळी अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी स्वताला अफगाणिस्तानाचे काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. तर, दुसरीकडे तालिबानकडूनही या पदासाठी मुल्ला बरादरचं नाव समोर आणलं गेलं आहे. त्यामुळे, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आता तिथला सत्तासंघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.
तर, सालेह यांनी हा निणर्य घोषित करताना अफगाणिस्तानच्या राज्यघटनेचा दाखला दिलेला आहे. अफगाणिस्तानच्या राज्यघटनेनुसार जर राष्ट्राध्यक्ष देश सोडून गेले असतील किंवा ते अनुपस्थित असतील तर त्या परिस्थितीत जे उपराष्ट्रपती असतात, ते काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून तत्काळ कार्यभार स्वीकारत असतात किंवा त्यांना तत्काळ तशी जबाबदारी मिळत असते. याच पार्श्वभूमीवर आज सालेह यांनी स्वतःला काळजीवाहून राष्ट्राध्यक्ष घोषित केल्याचं दिसत आहे.
अमरुल्लाह सालेह यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ”अफगाणिस्तानच्या घटनेनुसार अध्यक्ष अनुपस्थित असतील, पळून गेलेले असतील, राजीनामा दिला असेल किंवा त्यांचे निधन झाले असेल, तर उपाध्यक्ष हे हंगामी अध्यक्ष बनू शकता. सध्या मी माझ्या देशातच असून काळजीवाहू अध्यक्षपदाची कायदेशीर जबाबदारी घेत आहे. लवकर मी सर्व नेत्यांशी संपर्क करून त्यांचा पाठिंबा आणि सहमती मिळवणार आहे.”
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/