सुप्रेम हेल्थ अँड ट्रॉमा केअर तर्फे हाडांची ठिसूळता तपासणी शिबिर संपन्न
नाशिक : सुप्रेम हेल्थ अँड ट्रॉमा केअर तर्फे सामाजिक उपक्रमा अंतर्गत बिटको चौकातील भुतडा क्लिनिक मध्ये हाडांची ठिसूळता तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिराचे संयोजक डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. सुषमा भुतडा, डॉ. प्रितेश भुतडा यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. हे शिबिर मोफत होते.
युवा गटाकडून ते ज्येष्ठांच्या गटापर्यंत 54 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. कमी व अयोग्य आहार तसेच चुकीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये त त्यातही युवकांमध्ये हाडाची ठिसुळता, अस्थिघनता आदी आजार वाढत असल्याचे नमूद करत डॉ. प्रशांत भुतडा यांनी हाडांची निगा आणि आहार याबाबत मार्गदर्शन केले.