मनसेतर्फे सातपूर येथे साईबाबा मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन

Connect With Us

नाशिक : ओसरत असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध आस्थापना, मॉल, दुकाने व सार्वजनिक ठिकाणे, राजकीय पक्षांच्या यात्रा व राजकीय मेळावे सुरु आहेत. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार मंदिरे बंद ठेवून हिंदू बांधवांच्या आस्थेवर बंदी आणू ईच्छित आहे. देशातील ईतर ठिकाणची मंदिरे उघडलेली असतांना राज्यातील मंदिरे मात्र अजूनही बंदच आहेत. आघाडी सरकारच्या या हिंदू विरोधी धोरणाचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे तात्कालिक न उघडल्यास मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज नाशिक मध्ये सातपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आनंद छाया येथील प्रसिद्ध श्री साईबाबा मंदिर येथे घंटा नाद आंदोलन करण्यात आले व साईबाबांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली.

या प्रसंगी मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक  सलीम (मामा) शेखसातपूर प्रभाग सभापती तथा नगरसेवक योगेश शेवरे, सातपूर विभाग अध्यक्ष योगेश लभडेशहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, विजय अहिरे, शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, मिलिंद कांबळे, शहर प्रवक्ता अंबादास आहिरे, महिला जिल्हाध्यक्षा कामिनीताई दोंदे, महिला सेनेच्या सातपूर विभाग अध्यक्षा आरतीताई खिराडकर, पश्चिम विभाग विधानसभा निरीक्षक – अनिताताई ठोक, निर्मलाताई पवार, रोजगार-स्वयंरोजगार विभाग शहराध्यक्ष राम बिडवे, लक्ष्मण साळवे, गणेश जायभावे, सागर निगळ आदि पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक वैभव महिरेनिशांत  शेट्टी, विशाल भावलेप्रवीण अहिरे, सतीश वाघ, अक्षय भदाणे, जयेंद्र खरात, निखिल सिन्हा, मोहम्मद जिलानी, अनिकेत सिन्हा व परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक व साईभक्त उपस्थित होते.

 

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us