कोरोनाच्या काळात रात्रंदिवस मेहनत करणारा योद्धा पडद्यामागेच : फा. लोकेश खरात
सायन्स शाखेतील एक क्षेत्र म्हणून फार्मसीकडे पाहिले जाते. नवीन औषधांची निर्मिती करणे. जे औषधे आहेत त्यांच्यात काळानुसार बदल करणे, विकास करणे आणि औषधांचे वितरण आदी काम या क्षेत्रातील पदवीधर म्हणजेच फार्मासिस्ट (औषध निर्माता) करतात.
रुग्णांच्या आजारावर डॉक्टर औषध देतात या औषधांचे उत्पादन करणे, नवनवीन औषधे शोधणे, औषधांची गुणवत्ता तपासणे आणि सांभाळणे. औषध बाजारात आणण्यापूर्वी प्रयोगशाळेत त्याची तपासणी करणे. तसेच या औषधांचे मानवी शरीरावर दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होऊ नये याची खबरदारी घेणे ही सर्व कामे फार्मासिस्ट (औषध निर्माता) करत असतो.
फार्मासिस्ट हा हेल्थकेअर सिस्टम म्हणून आरोग्य क्षेत्रातील एक प्रमुख म्हणून ओळखला जातो. हॉस्पिटल फार्मसिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट, इंडस्ट्रियल फार्मासिस्ट, रिटेल फार्मासिस्ट, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘रिसर्च’ फार्मासिस्ट अशा अनेक प्रकारे औषध निर्माता म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे फार्मासिस्टचा ( औषध निर्माता) परिचय माझ्या मते आहे. आरोग्य क्षेत्रातील फार्मासिस्ट हा प्रमुख घटक उच्चस्तरावर मानला पाहिजे. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या लढाईमध्ये भारतातील डॉक्टर्स, सफाई कामगार आणि पोलीस प्रशासन यांचा सन्मान मी पण केला. त्याच बरोबर फार्मासिस्टने (औषध निर्माता ) मोलाचे योगदान देशासाठी दिले आणि देत आहेत. परंतु फार्मासिस्टचा कोणी उल्लेखही केला नाही याची खंत मला वैयक्तिकरित्या वाटते. फार्मसिस्टला कोरोना योद्धा म्हणुन पाहिजे तितके खाजगी आणि सरकारी स्तरावर स्थान मिळाले नाही हे दु;ख वाटते.
फार्मासिस्ट डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखला जातो. कारण रुग्णसेवेत औषध निर्माता हा प्रथम मानला जातो आणि मानला गेला पाहिजे असे माझे मत आहे. डॉक्टर रुग्णांना जीवदान औषधा मार्फत देतात आणि फार्मासिस्ट औषधांना जीवन देण्याचे काम करतात. डॉक्टरांच्या हातात औषध असेल तर डॉक्टर, नर्स रुग्णांवर उपचार करतील. हे औषध आणि इंजेक्शन आम्ही फार्मासिस्ट तयार करतो. औषध निर्माता हा औषध निर्मिती करतो आणि डॉक्टर हेच औषध अनेक प्रकारे रुग्णांना उपचारासाठी देतात. बाहेरच्या विकसित देशात डॉक्टर आणि फार्मासिस्ट हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू मानल्या जातात . डॉक्टर रुग्णांच्या रोगाचे निदान करून उपचार करतात तर फार्मासिस्ट औषधांचे उत्पादन करून त्यांना माहिती पुरवत असतात.
कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने फार्मासिस्टला कोरोना योद्धा म्हणून घोषित तर नाहीच केले पण कोरोना लसीकरणापासून अनेक फार्मासिस्ट वंचित ठेवले. कोरोनात फार्मासिस्टने अनेक प्रकारे हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी रात्रंदिवस रुग्णांना सेवा दिली. अनेक फार्मसिस्ट मित्रांनी वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना सेवा देण्याचे काम केले आणि करत आहेत. मात्र महामारीच्या काळात दिवस-रात्र मेहनत करणारा हा योद्धा पडद्यामागेच राहिला.
”सलाम त्या सर्व डॉक्टरांना, फार्मासिस्ट, सफाई कामगार, आणि सरकारी पोलीस प्रशासनास आणि आरोग्य क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारे काम करणाऱ्य योद्धाना”…
>फार्मासिस्ट. लोकेश खरात , नाशिक
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/