मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने ट्रोल झालेल्या बेबो ने अखेर मौन सोडलं, म्हणाली…
मुंबई : करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर असल्याचं कळताच सोशल मीडियावर पुन्हा एकदा या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली. अनेकांनी जहांगीर या नावावरुन करीना आणि सैफला ट्रोल केलं. करीनाने कपूरने तिच्या ‘प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकात दुसऱ्या मुलाचं नाव ‘ जहांगीर’ ठेवल्याचा खुलासा केलाय. करीना कपूर चा पहिला मुलगा म्हणजे तैमूर च्या नावा वरुण देखील बेबो ट्रोल झाली होती.
दरम्यान, या आधी करीना आणि सैफने आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव ‘जेह’ ठेवल्याचं वृत्त समोर आलं होतं. ‘जेह’ या नावावर कुणीही हरकत घेतली नसली तरी सैफिनाच्या मुलाचं खरं नाव जहांगीर असल्याचं कळताच नेटकऱ्यांनी करीनावर निशाणा साधण्यास सुरुवात केली.
यावर मात्र आता करीना कपूरने अखेर मौन सौडलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, “मी पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. नकारात्मकतेकडे मी लक्ष देत नाही. कोव्हिडने सगळ्यांना जवळ आणलं आपण या बद्दल विचार करायला हवा. राहिला प्रश्न ट्रोलर्सचा तर त्यांना हाताळण्यासाठी मला ध्यान करावं लागेल. आपण दोन लहान निरागस मुलांबद्दल बोलतोय याचा जरा विचार करा.” असं करीना म्हणाली.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/