कोव्हिड लसीकरणा दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

Connect With Us

सिन्नर ; सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पास्ते या गावांमध्ये लसीकरण सत्र सुरू असताना त्या गावातील काही नागरिक यांनी लसीकरण सत्रात कार्यरत असलेले आरोग्य सेवक श्री सूर्यवंशी यांच्याशी भांडण करत गावातील व्यक्तींनी त्यांच्या श्रीमुखात भडकावली. या गोष्टीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण करण्यात आली. त्याच प्रमाणे तेथील दोन आरोग्य सेविका यांना धक्काबुक्की केली यामध्ये त्या आरोग्य सेविकांचे बांगड्या तोडण्या पर्यंत लोकांची मजल गेली. या घटनेचा सिन्नर तालुका जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे सिन्नर तालुक्यातील आम्ही आरोग्य कर्मचारी तीव्र निषेध करीत आहे.

आजवर एका लसीकरण सत्राला एका टीमला जास्तीत जास्त शंभर लाभार्थी लसीकरण करावे असा शासनाचा नियम आहे तरीदेखील काळाचे भान लक्षात घेता आमचे आरोग्य कर्मचारी तीनशे ते साडेतीनशे पर्यंत लसीकरण करताहेत यामागे हेतू खूप प्रामाणिक आहे लवकरात लवकर तिसरी लाट सुरू होण्याच्या अगोदर जास्तीत जास्त लोकांच्या लसीकरण कसे करता येईल यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत.  आज दिनांक 17 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या जन्मदिवसा निमीत्त जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट शासनाने आम्हाला दिले होते त्या अनुषंगाने आज शुक्रवार असून लहान बालकांचे नियमित लसीकरण सत्र करून देखील आमचे बहुसंख्य आरोग्य कर्मचारी पुन्हा लसीकरणाचे ड्युटीवर गेले.

त्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पास्ते या गावांमध्ये आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर हा प्रसंग ओढवला ही अतिशय निंदनीय बाब आहे आम्ही सिन्नर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी कशा पद्धतीने काम करत आहोत हे आम्हाला ठाऊक आहे. आमच्या तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 50% आहे आमच्या प्रत्येकावर कामाचं तिप्पट ते चारपट ओझं आहे.
असं असताना लसीकरण सत्रावर वर पोलीस कर्मचारी हे कधी उपस्थित असतात हा एक संशोधनाचा विषय आहे. जरी पोलीस कर्मचारी आले तरी ते अकरा बारा वाजता वाजता येतात तोपर्यंत सकाळच्या वेळी उभे असलेले लाभार्थी टोकन वाटताना होणारा गोंधळ या सगळ्यांना आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते आणि अकरा बारा वाजे नंतर पोलीस कर्मचारी आल्यानंतर ते आपल्या चारचाकी गाडीमध्ये बसून पसंत करतात.

त्यामुळे या गोष्टीचा निषेध करत आम्ही संबंधित संबंधितांना अटक होऊन त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही सिन्नर तालुक्यातील कोव्हिड लसीकरण सत्र थांबवत आहोतत्याच प्रमाणे लसीकरण सत्र भविष्यामध्ये सुरू करण्याच्या वेळी पोलिस कर्मचारी तिथे उपस्थित नसेल, तसेच आम्हाला सुरक्षिततेची हमी नसेल तर आमच्या आरोग्य कर्मचारी लसिकरण करणार नाही. असे प्रतिपादन आरोग्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अभिजित देशमुख यांनी केले आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us