तालिबानचे महिलांसाठी १० नियम; सँडल, टाईट कपडे घालण्यास बंदी…., पालन न केल्यास कठोर शिक्षा
काबुल : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आता तालिबानने आपले कायदे-कानून लागू करण्यास सुरुवात केली आहे. रविवार पासून अफगाणिस्थानात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. देश सोडून जाण्यासाठी नागरिक प्रयत्न करतायेत अशातच आता तालिबानने आपले कायदे-कानून लागू करण्यास सुरुवात केली आहे
परंतु, याचा सर्वाधिक फटका हा महिलांना बसताना दिसत आहे. तालिबानने महिलांसाठी १० नियम लागू केले आहेत. शरियानुसार बनवलेल्या या नियमांचे पालन करणे महिलांसाठी बंधनकारक आहे. तसे न केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
तालिबान नियम न पाळल्यास कठोर शिक्षा देण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. महिलांसाठी बनवलेले नियम कायदे जर कुणी मोडले तर त्यांना क्रूर शिक्षा मिळू शकते. तालिबानच्या काळात महिलांना सार्वजनिकरीत्या अपमानित करणे तसेच बेदम मारहाण करून त्यांना मृत्यूदंड देणे ह्या शिक्षा सामान्य होत्या. अवैध संबंध असल्यास अशा महिलेला सार्वजनिकरीत्या मृत्यूदंड दिला जातो. टाईट कपडे वापरल्यासही अशीच शिक्षा दिली जाते. तसेच एखादी मुलगी लग्नातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तिचे नाक आणि कान कापून तिला मरण्यासाठी सोडले जाते. तसेच महिलांनी नेल पेंट लावल्यास त्यांची बोटे कापण्याची शिक्षा दिली जाते.
महिलांसाठी १० नियम
- घराबाहेर पडताना महिलांनी बुरखा परिधान करणे अनिवार्य आहे
- जवळचा नातेवाईक सोबत असल्याशिवाय महिलांना घराबाहेर पडता येणार नाही
- सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसमोर महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये
- महिलांच्या येण्याची चाहूल पुरुषांना लागू नये यासाठी महिलांनी हाय हिल्स वापरू नयेत
- ग्राऊंड फ्लोअरवर असणाऱ्या घरांच्या खिडक्यांच्या काचा रंगवलेल्या असल्या पाहिजेत. जेणेकरून घरात राहणाऱ्या महिला दिसरणार नाहीत.
- महिलांना फोटो काढण्यास बंदी असेल. तसेच त्यांची छायाचित्रे वृत्तपत्रे, पुस्तके आणि घरांमध्ये लावता कामा नयेत
- महिला शब्द सुद्धा कुठल्याही जागेच्या नावावरून हटवण्यात यावा
- घराच्या बाल्कनीमध्ये तसेच खिडकीमध्ये महिला दिसता कामा नयेत.
- महिलांनी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता कामा नयेत
- महिलांनी नेल पेंट लावता कामा नये. तसेच त्यांनी कुटुंबीयांच्या मर्जीशिवाय विवाह करू नये
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/