अखेर नारायण राणे यांना जामीन मंजूर; महाड न्यायालयाचा निर्णय!

Connect With Us

मुंबई ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त विधान केले, याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पडले, दरम्यान, नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी नारायण राणेंना जामीनाचा अर्ज  मंजूर झाला आहे. तर, न्यायलयाने निर्णय देताना, पोलीस कोठडीची गरज नाही असं देखील सांगितलं.

या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

दरम्यान, नारायण राणे जबाबदार व्यक्ती आहेत, असं असतानाही ते बेजबाबदारीने का वागले? असा प्रश्न सरकारी वकिलाकडून उपस्थित करण्यात आला होता. तर, नारायण राणेंच्या वकीलानी यावर युक्तीवाद करत म्हटलं की, त्यांच्यावर लावली गेलेली कलमं चुकीची आहेत,अशं सांगण्यात आलं होतं. तासाभराच्या युक्तिवादानंतर अखेर नारायण राणेंचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना केंद्रीयमंत्री  नारायण राणे यांनी  “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.” असे वादग्रस्त विधान केलं होते. याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात पसरले. दरम्यान शिवसेनेने राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत, राज्यभर आंदोलनं सुरू केली. तर भाजपा कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. दरम्यान, नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केले होते.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 

 


Connect With Us