अनिल देशमुख यांच्या वकिलाला सीबीआयकडून अटक

Connect With Us

मुंबई, 2 सप्टेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक मोठा झटका बसला आहे. कारण, अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने  अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात चौकशी अहवालात छेडछाड आणि लीक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे.अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लिन चिट दिल्याचा सीबीआयचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हा अहवाल बाहेर कसा आला याचा सीबीआय मागच्या सहा दिवसापासून तपास करत होते. त्यांनतर ही कारवाई झाली. सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याला अटक केली. तर वकील आनंद डागा आणि इतर काही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोबतच अभिषेक तिवारी यांचे सीबीआय कार्यालयातील लॉकर आणि अलाहाबाद येथे देखील सीबीआयने तपासणी केली.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारी आनंद डागाच्या संपर्कात होता. काही टेलिफोनिक संभाषणाच्या आधारे अटक करण्यात आली आहे. आनंद डागा यांचे आणि तिवारी यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे. अलाहबाद येथे आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. मुंबई, दिल्ली आणि अलाहबाद येथे रात्री उशीरा पासून सीबीआयचे छापे सुरु आहेत.

आनंद डागा यांचा ट्रान्सीट रिमांड घेतला जाणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात हा हजर केले जाणार आहे. या प्रकरणी नागपूर येथे धाड पडण्याची शक्यता असून आनंद डागा यांना पैसे कोणी दिले या संबंधी ही धाड असल्याचे बोलले जात आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us