‘त्या’ अफगाणी नागरिकांसाठी मोदी सरकारकडून महत्त्वाची घोषणा

Connect With Us

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला.यानंतर आता अफगाणी नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारनं महत्त्वाची घोषणा केली आहे.

दोन दशकांनंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली आहे. देशातील परिस्थिती बिघडत चालली असून लाखो लोक देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे. तालिबानने अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानच्या परिस्थितीकडे लागलं आहे. भारतासह इतरही अनेक देश आपापल्या देशातील नागरिकांना तिथून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे.

दरम्यान केंद्र सरकारनं अफगाणी नागरिकांसाठी ‘ई-आपत्कालीन व्हिसा’ या नव्या श्रेणीची घोषणा केली आहे. ‘केंद्रीय गृह मंत्रालयानं अफगाणिस्तानातील सद्यस्थिती पाहून व्हिसा प्रक्रियेचा आढावा घेतला आहे. भारतात प्रवेशासाठी फास्ट ट्रॅक व्हिसा अर्जांसाठी ई आपत्कालीन एक्स विविध व्हिसा’ नावानं इलेक्ट्रॉनिक व्हिसाची एक श्रेणी सुरू करण्यात आली आहे,’ अशी माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. विविध विकास योजनांमध्ये आणि अभियानांमध्ये भारताला सहकार्य केलेल्या सर्व अफगाणी नागरिकांना व्हिसा जारी करण्यात येणार आहे.

अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांसोबतच अफगाणी शिख आणि हिंदू समुदायांच्यादेखील संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. ‘अफगाणिस्तान सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागरिकांना भारताकडून मदत दिली जाईल. विकास, शिक्षण क्षेत्रात भारतात सहकार्य करणाऱ्या नागरिकांच्या पाठिशी भारत उभा राहील. त्यांना सर्वतोपरी मदत करेल,’ असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us