मोठी अपडेट ! लाडक्या बहिणींना अर्ज मागे न घेण्याचं आवाहन, काय म्हणाल्या आदिती तटकरे
महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरु केली या योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये प्रदान केले जातात. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आले असून या योजने विषयी अनेक चर्चाना उधाण आले आहे. लाडक्या बहिणींनी महायुतीच सरकार सत्तेत आणल्यानंतर आता योजनेच्या अर्जाची छाननी सूरू केली आहे.या छाननीत ज्या महिला चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील त्यांच्याकडून दंडासहीत योजनेची रक्कम गोळा केली जाईल अशी चर्चा सूरू आहे.या भीतीपोटीच तब्बल 4000 हजार महिलांनी आपले लाडकी बहीण योजनेचे अर्ज मागे घेऊन पैसे परत केले आहेत. पण अशाप्रकारे कोणताच दंड आकारला जाणार नसल्याचे महिला बालविकास मत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महिलांनी दंडाच्या भीतीपोटी अर्ज माघारी घेऊ नये,असे आवाहन करण्यात येत आहे.
खरं तर सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सूरू केली आहे. यामध्ये ज्या महिलांनी चूकीच्या पद्धतीने योजनेला लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद करण्यासाठी सरकारने ही छाननी सूरू केली आहे. या दरम्यान जर अपात्र ठरणाऱ्या महिलांनी पैसे परत केले नाहीत, तर त्यांच्याकडून दंडाहित रक्कम वसूल केली जाईल,अशी अफवा पसरवली जात आहे.त्यामुळे भितीने तब्बल 4000 महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याचे आणि पैसे परत केल्याचे वृत्त समोर आले होते. भीतीपोटी महिलांनी हे अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे. या महिलां खरंच निकषातून बाद ठरत होत्या का? ही बाब समोरच आली नव्हती. त्यामुळे या महिला अफवांच्या बळी पडल्या आहेत.
महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे. ज्यांमध्ये असं आढळून आलं आहे की, काही महिला या लाभार्थी असून त्यांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने भरले आहे. काही जणांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. काही जणी आधीच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे आणि आता लाडक्या बहिणींचा सुद्धा हफ्ता घेत आहे. घरात दुचाकी किंवा चारचाकी आहे. अशा लाडक्या बहिणींनी स्वत:हुन मिळालेला लाभ परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.
लाडक्या बहिण योजनेची पडताळणी ही परिवहन विभाग, इन्कम टॅक्स विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. ही कायम स्वरुपात सुरू आहे. त्यामुळे काही महिलांनी स्वत: हून पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे, असंही तटकरेंनी स्पष्ट केलं.
पडताळणी कशी होणार
पिवळ्या, केशरी रेशनकार्डधारक महिलांनाच मिळणार लाभ
नमो शेतकरी सन्मान योजनेतील महिलांना केवळ 500 रुपयेच मिळणार
संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळणार
दरम्यान तुम्ही जर हे निकष डावलून अर्ज मागे घेत आहात, तर ते योग्यच आहे. पण जर तुम्ही पिवळ्या, केशरी रेशनकार्डधारक आहात तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेत सरकार 1000 रूपये देते, त्यामुळे लाडकी बहीणचे फक्त 500 रूपये या महिलांना मिळणार आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळणार आहेत.त्यामुळे जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. कुटुंबाची उत्पन्न मर्यादा 2.50 लाखाच्या वर आहे, अशाच महिलांचे अर्ज बाद होणार आहे. दंडासारख्या अफवांना बळी पडून अर्ज मागे घेऊ नका.