खासगी कंपनीविरोधात रुग्णवाहिका चालकांची नाशिकमध्ये बेमुदत बंदची हाक
नाशिक : नाशिकमध्ये नुकतीच एक खासगी कंपनी सुरु झालेली आहे. या कंपनीमार्फत शहरात रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका पुरविल्या जात आहेत. मात्र, शहरात स्थानिक चालकांकडे स्वत:च्या रुग्णवाहिका आहेत. पण, आता खासगी कंपनीच्या येण्यामुळे रुग्णवाहिका चालक तसेच वाहक यांच्यावर बेरोजगारी तसे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक रुग्णवाहिका चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी शहरात बेमुदत बंदची हाक दिली आहे.
शहरातील स्थानिक रुग्णवाहिकांचा नव्याने सुरु झालेल्या खासगी कंपनीमध्ये समावेश करावा अशी मागणी या आंदोलकांनी केली. जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत हा बंद सुरु राहील अशी भूमिका स्थानिक रुग्णवाहिका चालकांनी घेतली आहे.
दरम्यान, चालकांच्या या भूमिकेमुळे रुग्णांची हेळसांड होण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या कोरोना महामारीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची तसेच इतर अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/