१२ ते १७ वयोगटातील मुलांवर लस चाचणीच्या परवानगीसाठी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा अर्ज
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लसींना मंजूरी देण्यात आली आहे. आणि त्या अनुषंगाने देशभरात लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सिंगल डोस करोना व्हॅक्सिनला दोन आठवड्यापूर्वी भारतात मंजुरी देण्यात आली आहे. आता जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं भारतात १२ ते १७ वयोगटातील मुलांवर करोना लसीची चाचणी करण्यासाठी अर्ज केला असून केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली आहे.
“आम्ही लहान मुलांवर करोना लसीची चाचणी करण्यासाठी मंगळवारी अर्ज केला आहे. लहान मुलांचं लसीकरण लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”, असं कंपनीने आपल्या अर्जात म्हटलं आहे. “करोनाची साथ रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे.”, असंही त्यांनी सांगितलं आहे.
भारत सरकारने ७ ऑगस्ट २०२१ रोजी आमच्या एक मात्रेच्या लसीस आपत्कालीन वापराचा परवाना दिला आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाऊ शकते. ही लस डेल्टासह, करोनाच्या सर्व उत्परिवर्तित प्रकारांपासून संरक्षण देते. तिची परिणामकारकता ८५ टक्के आहे. सर्व भागांमध्ये तिच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोना संसर्गानंतर रुग्णालयात दाखल होण्यापासून तसेच मृत्यूपासूनही ती संरक्षण करते, असा दावा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रवक्त्याने केला. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने ५ ऑगस्टला एक मात्रा लसीला आपत्कालीन वापराच्या परवान्यासाठी अर्ज केला होता
लसीची परिणामकारकता किती?
- वैद्यकीय चाचण्यांत ही लस ८५ टक्के परिणामकारक ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे.
- डेल्टा विषाणूपासूनही संरक्षण मिळते, असेही कंपनीचे म्हणणे आहे.
- संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूपासून संरक्षण देते, असाही कंपनीचा दावा आहे.
- ‘बायॉलॉजिकल ई’ ही कंपनी या लशीचे भारतात उत्पादन करणार आहे.
- या लशीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/