पुण्यात अनंत चतुर्दशीला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी पुण्यातील निर्बंध विसर्जनाच्या दिवशी कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरू ठेवण्यात येणार आहेत. अशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
गणपती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी झाल्याने कोविड संसर्ग पसरण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे आणि आसपासच्या परिसरात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. मृत्युदर कमी झाला, रुग्ण वाढ कमी झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर 2 ऑक्टोबर ला नवा निर्णय घेऊ असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/