निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष!
मुंबई : संपूर्ण जगभरात हाहाकार घातलेल्या करोना मुले संपूर्ण देशाचे जनजीवन आणि आर्थिक घडी विस्कळीत झालीये. दरम्यान, काही दिवसांपासून मात्र राज्यातील करोना काहीसा आटोक्यात आल्याचे चित्र आहे, म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण जनजीवन सुरळीत होऊन आर्थिक घडी बसावी असा संपूर्ण जनतेचे मत आहे.
राज्यातील करोनासंदर्भातल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जावी, अशी मागणी आत्तापर्यंत सामान्य नागरिकांकडून केली जात होती. आता राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि खुद्द आरोग्य मंत्रालयानं देखील रुग्णसंख्या कमी झालेल्या भागांमध्ये निर्बंध शिथिल करायला हवेत, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे निर्बंधांविषयी आढावा घेणाऱ्या यंत्रणेनं अनुकूल भूमिका घेतली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाने निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातली आपली भूमिका मुख्यमंत्र्यांना कळवली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.