अक्षय कुमारचा चित्रपट ‘बेल बॉटम’! ‘या’ दिवशी होणार रिलीज
मुंबई : अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमारची जादू पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊननंतर अक्षयचा हा पहिला चित्रपट असेल, जो चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
रणजित तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अक्षयचा हा चित्रपट गेल्या वर्षीपासून बराच चर्चेत होता, कारण हा असा पहिला चित्रपट होता, ज्याचे कोरोना दरम्यान शूटिंग पूर्ण झाले. तथापि, त्यावेळी सर्व खबरदारी घेण्यात आली होती.
दरम्यान, संबंधित घोषणा करताना अक्षयने लिहिले, ‘मिशन: मोठ्या पडद्यावर तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्याचे. तारीख: 19 ऑगस्ट 2021, बेल बॉटमची अनाउंसमेंट’