विवाहानंतर नवऱ्याचा चेहरा पाहून नवरीने थेट गाठले पोलीस ठाणे !
देहराडून : नवविवाहित दाम्पत्य आपल्या नव्या आयुष्याची सुरवात मोठ्या उत्साहात सुरवात करतात परंतु, उत्तराखंडमधील सितारगंजमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. विवाहानंतर एका नववधूने वराचा चेहरा बघितल्या नंतर थेट पोलिस ठाणे गाठले आहे. सितारगंजमधील एका तरुणीचा विवाह एका वयस्कर व्यक्तीशी करण्यात आला होता. विवाहापूर्वी या तरुणीची फसवणूक करण्यात आली होती. असे तक्रार या नव्या नवरीने केली आहे.
वयस्कर नवऱ्याऐवजी एका तरुणाचा फोटो दाखवून तिला लग्नासाठी राजी करण्यात आले होते. मात्र विवाह करून ही तरुणी जेव्हा सासरी गेली. तेव्हा नवऱ्याचा चेहरा पाहून तिला धक्का बसला. तिचे लग्न लावून दिलेला नवरा वयस्कर निघाला. तो आधीपासूनच विवाहित होता. एवढेच नाही तर घरात त्याची पत्नी आणि मुलेही होती. दरम्यान, हा प्रकार पाहून ही नवरी तिथून पळाली. तिने सासरी जाण्यास नकार दिला. मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांसमोरही तरुणीने सासरी जाण्यास नकार दिला.
मिळालेल्या माहितीनुसार आता सदर तरुणीने वयस्कर पतीचे घर सोडून प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच तिने याबाबत पोलिसांकडे तक्रारही केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गंगाराम गोला यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल. शहरातील एक क्रमांकाच्या वॉर्डमधील तरुणी शेजारील तरुणासह पोलीस ठाण्यात पोहोचली. तरुणीने सांगितले की, तिचा विवाह बरेली जिल्ह्यातील सेंथल गावातील एका वयस्कर पुरुषासोबत लावून देण्यात आला. लग्नाला तयार करण्यासाठी तिला एका तरुणाचा फोटो दाखवण्यात आला. तो पाहून तिने लग्नाला होकार दिला. मात्र प्रत्यक्षात तिचा विवाह एका तीन मुलांच्या पित्यासोबत लावून देण्यात आला.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/