शो मध्ये कमबॅक करताच शिल्पा शेट्टीनं दिली ‘अशी’ पहिली प्रतिक्रिया
पतीनंतर महिलेला आपल्या हक्कांसाठी, अस्तित्वासाठी आणि आपल्या मुलांसाठी समाजाविरोधात लढाई लढावी लागते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शेट्टी पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी फिल्म प्रकरणात अटक झाली. त्यांनंतर शिल्पा शेट्टी टीव्ही रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर ४’पासून अनेक आठवडे दूर होती. त्या दरम्याम या शो मध्ये अनेक सेलेब्रिटींना आमंत्रित केल गेल. परंतु आता मोठ्या ब्रेकनंतर शिल्पा शेट्टीने पुन्हा एकदा सुपर डान्सर शोमध्ये कमबॅक केलेय.
सुपर डान्सर ४ च्या अपकमिंग एपिसोडसाठी शिल्पाने शूट केलं आहे. नुकताच या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला. ‘सुपर डान्सर’च्या मंचावर राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित एक डान्स परफॉर्मन्सनंतर तिने आपले महिलांच्या आयुष्यासंबंधीत अडचणींवर मत व्यक्त केले.
तसेच , यात शिल्पा शेट्टी सांगतेय की, “झाशीच्या राणी यांच्याबद्दल जेव्हा मी ऐकते तेव्हा वाटते त्या समाजाचा एक चेहरा आहेत. कारण आजही पतीनंतर महिलेला आपल्या हक्कांसाठी, अस्तित्वासाठी आणि आपल्या मुलांसाठी समाजाविरोधात लढाई लढावी लागते. लक्ष्मी बाई यांची कथा ही या सर्व महिलांना आपल्या आयुष्याची लढाई लढण्यासाठी प्रेरित करते. झाशीची राणी खरचं एक शक्तीशाली महिला होत्या. ही खरी घटना आपल्यासाठी एका इतिहास आहे. मला अभिमान आहे की, आपण एका निर्भय देशात जन्म घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीशी लढण्याची महिलांमध्ये शक्ती असते. आपल्या हक्कांसाठी त्या लढतात, याचा मला अभिमान आहे. त्या सर्व महिलांना माझा आज साष्टांग दंडवत प्रणाम.”
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/