४१ वर्षांनी घडवला इतिहास, हॉकीत भारताला ब्रॉंझ
tokyo2020 : भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 3 गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 2 गोल डागून जर्मनीला धक्का दिला.पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यांचे मनसुबे भारतीय डिफेंडरने उधळून लावले.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच 17 व्या मिनिटाला भारतीय संघाने जर्मनीला प्रत्युत्तर दिले. निलकंठ शर्माने दिलेल्या पासच्या जोरावर समरजीत सिंगने भारतीय संघाला 1-1 बरोबरीचा गोल करुन दिला.
भारताने सामन्यात बरोबरी साधल्यानंतर जर्मनीने अवघ्या चार मिनिटात दोन गोल डागत भारतीय संघाला पुन्हा एकदा अडचणीत आणले. त्यानंतर
तिसऱ्या क्वार्टरमध्ये रुपिंदर पालने भारतीय संघाला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. पेनल्टी स्ट्रोक गोलमध्ये रुपांतरीत करत भारतीय संघाने आघाडी मिळवून दिली.
सामन्याच्या 31 व्या मिनिटाला भारतीय संघाने सामना आपल्या बाजूने फिरवला. त्यानंतर 34 व्या मिनिटाला सिमरनजितने भारताची आघाडी भक्कम केली. गुरजितसिंगच्या पासवर त्याने गोल डागत भारताला 5-3 अशा आघाडीवर नेत ब्रॉंज मेडलवर भारताने नाव कोरले.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7