महाराष्ट्र : डेंग्यू, मलेरिया टेस्ट निगेटिव्ह रूग्णांची होणार ‘झिका’ चाचणी
मुंबई ; महाराष्ट्रात डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजारांमध्ये निगेटीव्ह येणाऱ्या रूग्णांची तपासणी झिका व्हायरससाठी करण्यात येणार आहे. नियमित आजारांच्या चाचण्यांसोबत या प्रयोगशाळांमध्ये झिका व्हायरससाठीची चाचणी होणार आहे. एनआयव्हीच्या माध्यमातून आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी या टेस्टिंग लॅबला उपकरणे पुरविण्यात येणार असल्याची बातमी एका दैनिकाने दिली आहे.
तसेच या रूग्णांचे सातत्याने निरीक्षणही करण्यात येणार आहे. या रूग्णांच्या माध्यमातून नवनवीन व्हायरल इन्फेक्शनची प्रकरणे समोर येत नाहीत ना ? याबाबतची तपासणी करण्यात येईल. राज्यातील प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. राज्यात सध्या झिका व्हायरस ट्रॅक करण्यासाठी एकुण ५७ प्रयोगशाळांचे नेटवर्क सज्ज आहे. त्यापैकी सहा प्रयोगशाळा या भारतात आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील प्रयोगशाळांमध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर), कस्तुरबा हॉस्पिटल (मुंबई) आणि हाफकीन इन्स्टिट्यूट (मुंबई) या ठिकाणांचा समावेश आहे. तर आणखी तीन शासकीय प्रयोगशाळांची नेमणुक झिका व्हायरसच्या प्रयोगशाळेसाठी होणार आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ची नेमणुक झिका व्हायरस चाचणीसाठी करण्यात आली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की, डासांमधील एडिस जातीच्या डासांपासून झिका व्हायरसचा संसर्ग होतो. तसेच डेंग्यू आणि चिकुनगुनिया व्हायरसच्या माध्यमातूनही हा आजार पसरतो. म्हणूनच झिकाचा संसर्ग तपासण्यासाठी आता डेंग्यू आणि चिकुनगुनिया टेस्ट निगेटिव्ह आलेल्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7