शुल्क माफीसाठी ‘जनसुनावणी’ होईपर्यंत AISF चं बेमुदत साखळी उपोषण
नाशिक : कोरोना काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करावी या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने (AISF) नाशिकमध्ये बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनांनंतर १५ जुलै २०२१ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीविषयी शिफारशी करण्याकरीता राज्य सरकारने समिती नेमलीय.
तसेच, या संदर्भात संघटनेने म्हटलयं कि, “कोविड-19 लॉकडाऊन काळात शाळा व महाविद्यालय पुर्णतः बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही सोयी व सुविधांचा लाभ घेतलेला नाही. संपूर्ण फी वसूल करण्याचे संस्था चालकांचे धोरण हे बेकायदेशीर आहेत. याविरुद्ध AISF मार्फत एप्रिल महिन्यापासून आंदोलन चालविण्यात येत आहे. ऑनलाईन प्रोटेस्ट, निदर्शने, ठिय्या आंदोलने आणि विधी मंडळासमोरील सत्याग्रह यामुळे शासनाला सदर समितीची नेमणूक करणे भाग पडले आहे.”
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7