Covishield आणि Covaxin ला लवकरच बाजारात विक्रीसाठी मिळणार मान्यता

Connect With Us

नवी दिल्ली  ; देशात आता कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस बाजारात उपलब्ध होणार आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसींना लवकरच त्यांच्या विक्रीसाठी भारताच्या औषध नियामकाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

या लसींच्या प्रति डोसची किंमत २७५ रुपये आणि अतिरिक्त सेवा शुल्क १५० रुपये असण्याची शक्यता आहे. नॅशनल फार्मस्युटिकल प्राईसिंग अथॉरिटीला (NPPA) लस परवडण्याजोगी बनवण्यासाठी लसींच्या किंमती मर्यादित करण्याच्या दिशेने काम सुरू करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

दरम्यान,  खासगी रुग्णालयात कोव्हॅक्सिनची किंमत १ हजार २०० रुपये प्रति डोस आणि कोविशिल्डची किंमत ७८० रुपये प्रति डोस आहे. या किंमतीमध्ये १५० रुपये सेवा शुल्काचा देखील समावेश आहे. देशात फक्त या दोन्ही लसी आपात्कालीन वापरासाठी अधिकृत आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या कोरोनावरील विषय तज्ज्ञ समितीने १९ जानेवारीला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला काही अटींसह प्रौढांसाठी नियमितपणे विक्री करण्यास मान्यता देण्याची शिफारस केली होती.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी २५ ऑक्टोबरला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला एक निवेदन दिले होते, ज्यामध्ये कोविशिल्ड लसीचा नियमित बाजारात उतरवण्यास मंजूरी देण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर काही आठवड्यापूर्वी भारत बायोटेकचे संचालक वी. कृष्ण मोहन यांनी कोव्हॅक्सिन नियमित बाजारात उतरवण्याची मागणी करत प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह रसायनशास्त्र, सूत्रीकरण आणि नियंत्रणाची संपूर्ण माहिती सादर केली होती. देशात गेल्या वर्षी ३ जानेवारीला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली गेली होती.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us