बहादरपूर येथील दसरा उत्सव म्हणजे आम्हा बाविस्करांसाठी एक प्रेरणास्तोत्र

Connect With Us

दर वर्षी दसऱ्याला शिरसोदे- बहादरपुर, महाळपुर या तिन्ही गावचे लोक बाविस्कारांचे शेतात सोने घ्यायला येतात परिसरात कुठेही आपट्याचे झाड नाही फक्त बाविस्करांचे वाडवडील यांचे समाधी स्थळावरच ते उपलब्ध आहे. बाविस्कारांच्या पाच पिढ्यांमध्ये मल्हारी मार्तन्डाचे भक्त होते, भगत होते त्यांचे अंगात खंडेरावाचे प्रखर वारे होते ते पिढ्यांपिढ्या दर वर्षी अनवाणी पायाने बहादरपुर येथून खंडेरायाची पताका ध्वज घेऊन चंपाषाठी पर्यंत जेजुरीला मजल दर मजल करीत अनवाणी पायी पोहचत असत। जेजुरीला प्रथम ध्वज खांदेशातील बहादरपूरच्या बाविस्कर घराण्याचे फडकत असे. ध्वज लागत असे. असे जुने वाड वडील आणि गावातील जुनी वयोवृध्द मन्डळी यांचे कडून ऐकण्यात येत असे. त्यांची खूप मोठी श्रद्धा खंडेराव देवावर होती त्या श्रध्येपोटी शंभर वर्षापूर्वी श्री खंडेरायाचे मंदिराची स्थापना बाविस्करांचे शेतात केली गेली.

खन्डेरायाच्या अहोरात्र सेवेमुळे,  आराधनेमुळे आणि त्यांना देवाने दिलेल्या अलौकिक शक्ती, गुणांनी ती भुमी त्यांनी पवित्र केली.  त्यामूळे ते मल्हारी मार्तन्डचे एक जागृत देवस्थान उदयास आले. मार्तन्डाचे कृपा प्रसादाने आशिर्वादामुळे बाविस्कर घराण्यात अनेक बुध्दिवान, गुणवान, कर्तृत्ववान जन्मास आले ते ब्रिटिश काळापासून मोठ मोठ्या हुद्यांवर गेलेत.  त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा अटकेपार उमटवला आणि स्वता पुढे जात आपल्या कुटुंबाला, नातेवाईक यांना आणि जातीला सुध्दा पुढे नेण्याचा खुप मोठा प्रयत्न केला. स्वताचे शून्यातून विश्व साकारत असतानाच वेळ काळ परिस्थितीचे भान ठेवत आपली कुवत ओळखत प्रस्थापित व्यवस्थेत लढत राहिले.  आपल्या प्रगतीत येना-या उणीवा काय कमजोरी काय ह्या जाणून त्यांनी आपली शक्ती स्थळे निर्माण केलीत आणि प्रगती पथावर येऊन पोहचलीत.

आजही येथील ‘दसरा उत्सव’ हा त्याची साक्ष देतो संपूर्ण गावकरी श्रध्दा भावनेने आपट्याची पाने ज्याना दसरा या दिवशी सोन्याचा मान दिला जातो ती बाविस्कराचे शेतातील कुलदैवत मल्हारी मार्तन्ड यांचे मंदिरात खंडराव देवाचे दर्शन घेऊन त्यांना प्रेमभावाने ती वाहतात नंतर बाविस्कारांचे वाड वडीलांचे चरणी अर्पण करीत असतात. त्यानंतर मंदीर परिसरात उपस्थित ब्राम्हण गन्णाची पुजा अर्चना करून आशिर्वाद घेऊन भेटेल त्या स्नेही जणाना अपट्याची पाने वाटत एकमेकाना आलिंगन देत गावभर सण साजरा करतात. त्यातील मजा आणि आनंद वेगळाच आहे.  तिथे गरीब श्रीमंत हा भेद नाही तिथे उच्च निच्च जाती भेद नाहि.  जो तो एकमेकांना प्रेमाने भेटत असतो एकमेकांना प्रेमाने आलिंगन देत असतो.  हे सर्व तिथे उपस्थीत राहून डोळे भरून बघत असताना सत्य जाणवते की, हे आमच्या समाजासाठी जाती साठी नातेवाइकान्साठी आणि आम्हा “बाविस्करांसाठी गर्वाची बाब आहे अभिमानाची बाब आहे म्हणूनच समस्त बाविस्करांकडून एकच अपेक्षा आम्ही सर्वानी आपल्या वाड वडीलान्चे दसरा ह्या पवित्र दिनी आपले कुल दैवत मल्हारी मार्तन्डाचे मनोभावे पूजन करून आपल्या ईश्वर रुपी वाड वडीलांचे ही स्मरण करावे त्यांचे स्मरणातून आपल्याला , आपल्या पुढच्या पिढीला अजून प्रगतीचा मार्ग सापडेल सुख समृध्दीचा मार्ग सापडेल ह्यात दुमत नाही! ह्या निमित्ताने येवढेच!

>>लेखक श्री. काशिनाथ बाविस्कर (तलाठी, जामनेर जि. जळगाव)

 

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 

 


Connect With Us