‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम नट्टू काका यांचे निधन
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील लोकप्रिय अभिनेते घनशाम नायक म्हणजेच नट्टू काका यांचे आज निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून घनशाम नायक कॅन्सर आजाराशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली असून आज सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी नट्टू काका यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻 ॐ शान्ति #Natukaka @TMKOC_NTF pic.twitter.com/ozyVHZrFvI
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) October 3, 2021
घनश्याम नायक यांनी जवळपास 350 हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु त्यांना खरी प्रसिद्ध मिळाली ती तारक मेहता या मालिकेत. नट्टू काका या शोमध्ये जेठालालच्या दुकानात त्यांचे मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे दाखवण्यात आले होते. नट्टू काका आणि बागा या दोघांची जोडी फार प्रसिद्ध होती. मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. मी जिवंत आहे, तोपर्यंत मी काम करत राहिल. चेह-यावर मेकअप लागलेला असतानाच मला मरण यावे, अशी माझी शेवटची इच्छा आहे, असे ते काही महिन्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/