जिल्हा परिषदेत 58 कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या
सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी पदी बढती
नाशिक: मागील आठवड्यात अनुकंपा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत समावेश केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषद सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी आनंदराव पिंगळे व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या होत्या, त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत सेवेतील वरिष्ठ सहायक पदावरील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर १६ तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावरून सहायक प्रशासन अधिकारी ०६ तर ग्रामसेवक पदावरून ग्रामविकास अधिकारी या पदावर ३६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, यावेळी महिला, वयोवृद्ध, दिव्यांग, दुर्धर आजाराने त्रस्त, पती पत्नी एकत्रीकरण यांच्याबाबत पदोन्नती देताना सहानुभतीपूर्वक विचार करण्यात आला.
असे आहेत पदोन्नती झालेले कर्मचारी –
सहायक प्रशासन अधिकारी :पाठक वृषाली दिलीप,जाधव ललिता ज्ञानेश्वर, भुजबळ राजेंद्र गणपत, नवले प्रमोद रंगनाथ, सोनवणे संजय, किसनराव, कचवे नरेंद्र दंगल
कनिष्ठ प्रशासन अधिकारी: दराडे अनिल एकनाथ,रासने आनंदा देविदास, मालुसरे नितीन किशोर, शेवाळे रविंद्र भैय्यासाहेब, पाटील निलेश भगवान,धोंगडे दिलीप रामचंद्र, भुजबळ गणेश विठ्ठल, बिरारी दिलीप रामचंद्र, लोखंडे उदय एकनाथ, राऊत सुदाम पांडुरंग, औटे किशोर नारायण, भोये वामन गंगा, कापसे ज्ञानेश्वर सोनु,अश्विनी संतोष थैल,माळी संदिप रामदास,सचिन कल्याणराव विंचुरकर
याच समवेत ग्रामसेवक या संवर्गातून ग्रामविकास अधिकारी या पदावर 36 कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, लीना बनसोड यांनी ही सर्व पदोन्नती प्रक्रीया समुपदेशनाद्वारे राबविल्यामुळे कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पदोन्नती प्रक्रीयेमध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, उत्तम चौरे, रविंद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, रणजीत पगारे, निवृत्ती बगड, नितीन पवार, स्विय सहाय्यक,गौतम अग्निहोत्री, साईनाथ ठाकरे, सोनाली साठे, हर्षदा खैरनार, भास्कर कुवर, मंगेश केदारे, प्रमोद ढोले, स्टीवन शहाबंद्री, अशोक अहिरे, ज्ञानेश्वर गायकवाड, कानिफनाथ फडोळ, स्वप्निल कानडे, वसंत काळे, प्रमोद जाधव, अशोक खेडुलकर,सुनिल थैल, आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/