राज्यात ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

Connect With Us

राज्यात पुढील ४८ तास मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात मुंबई, कोकण, पालघर, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे.  तर पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्य़ामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यासाठी पावसासाठी पुढील २ दिवस अधिक महत्त्वाचे आहेत.

या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत वेगवान वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व राज्यांमध्ये तर २२ ते २६ सप्टेंबर या दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्याभरात पावसाची संततधार पुढील काही दिवस कायम राहणार आहे.

मराठवाडा, कोकण आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी कोसळणार आहेत. विदर्भात पुढील चार दिवस बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, वसई, विरार, नालासोपारामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. या भागात आज दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us