बॉइज टाऊन पब्लिक स्कूलमध्ये रोटरी क्लबची स्थापना
जागतिक स्तरावर रोटरी क्लब हे एक समाजसेवेचे मंदिर आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आपल्या वर्तुळाच्या बाहेर जात मैत्रीचे संबंध वाढवावेत तसेच सामाजिक प्रगती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून बॉइज टाऊन पब्लिक स्कूलमध्ये (boys town public school) रोटरी क्लबची स्थापना करण्यात आली. इयत्ता 7 वी ते 9 वी तील 32 विद्यार्थ्यांची समिती स्थापन करण्यात आली व या विद्यार्थ्यांचा 17 सप्टेंबर 2021 रोजी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.
समितीचे सात प्रमुख अधिकारी नेमण्यात आले. अध्यक्षा कुमारी युतिका छाजेड,उपाध्यक्ष कुमार सार्थक डांगे, सचिव कुमारी अमृता आव्हाड, खजिनदार कुमारी पलक देशावरे,सर्जंट अॅट आर्म्स कुमार देव जाधव, वैद्यकीय संचालक कुमारी स्नेहा भदाणे, संचालक कुमार समर्थ गवळी यांचा सत्कार करण्यात आला.
रोटरी क्लब नाशिक ग्रेपसिटीचे अध्यक्ष श्री अनिल देशमुख यांनी क्लबची उद्दिष्टे आणि सांगितली. श्री जयंत खैनार – रोटरी इंटरएक्टिव्ह क्लबचे सचिव देखील उपस्थित होते. मुख्याध्यापिका- डॉ.स्वामिनी वाघ यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट समाजसेवेसाठी प्रेरित केले आणि समाजात प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. विद्यालयाच्या शैक्षणिक पर्यवेक्षिका श्रीमती नीता ठक्कर यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/