दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी
गेल्यावर्षी दिवाळीत झालेलं वायू प्रदूषण पाहता यावर्षी आधीच केजरीवाल सरकराने फटाके बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्षी दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
“गेल्या ३ वर्षांपासून दिवाळीच्या वेळी दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक स्थिती पाहता, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवणुकीवर, विक्रीवर आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली जात आहे. जेणेकरून लोकांचे जीव वाचवता येतील. तसेच गेल्या वर्षी, व्यापाऱ्यांनी फटाके साठवल्यानंतर, प्रदूषणाचे गांभीर्य पाहता उशीरा पूर्ण बंदी घालण्यात आली, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी फटाक्याची साठवण न करण्याचे आवाहन सर्व व्यापाऱ्यांना करण्यात येत आहे.” अस ट्विट केजरीवाल यांनी केल आहे.
पिछले 3 साल से दीवाली के समय दिल्ली के प्रदूषण की खतरनाक स्तिथि को देखते हुए पिछले साल की तरह इस बार भी हर प्रकार के पटाखों के भंडारण, बिक्री एवं उपयोग पर पूर्ण प्रतिबंध लगाया जा रहा है। जिससे लोगों की जिंदगी बचाई जा सके।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 15, 2021
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/