Zomato चे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांचा राजीनामा
नवी दिल्ली : ऑनलाईन फूड होम डिलिव्हरी करणाऱ्या Zomato या कंपनीमधून एक मोठी बातमी आता समोर आली आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक गौरव गुप्ता (Zomato Co-Founder Gaurav Gupta) यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ मध्ये झोमॅटोत सामील झालेल्या गुप्ता यांच्याकडे २०१८ मध्ये कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं आपला आयपीओ (IPO) बाजारात आणला होता. या आयपीओमागील गुप्ता हे मुख्य चेहरा होता.
मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, झोमॅटोने फूड डिलीव्हरीसह किराणा मालाची विक्रीही (Zomato Grocery Delivery) ऑनलाईन सुरू करण्यास सुरुवात होती होती. काही दिवसांपूर्वी झोमॅटोने किराणा मालाची डिलीव्हरी बंद करण्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोनेही या वृत्ताबाबत पुष्टी केली आहे.
झोमॅटोचे सहसंस्थापक दीपिंदर गोयल आणि गौरव गुप्ता यांच्यात काही काळापूर्वी मतभेद झाल्यानेही त्यांनी ही एक्झिट केल्याचं बोललं जात आहे. गौरव गुप्ता यांनी 6 वर्ष झोमॅटोमध्ये राहिल्यानंतर आता नवा चॅप्टर सुरू करणार असल्याचं मेलमध्ये सांगितलं आहे.
झोमॅटोला पुढे नेण्यासाठी एक उत्तम टीम आहे. परंतु माझ्या प्रवासात आता पुढील मार्ग काढण्याची वेळ आली आहे. हे लिहितानाही मी अतिशय भावूक होत असून कोणत्याही शब्दात माझ्या भावना मांडता येणार नसल्याचा, भावनिक मेल त्यांनी लिहिला असल्याचं कंपनीच्या ब्लॉगमध्ये सांगण्यात आलं आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/