कोयना धरणातून 38,631 क्युसेस पाण्याचा विसर्ग

Connect With Us

सांगली  कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून 38 हजार 631 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. सध्या आयर्विन पुलाची पाणी पातळी 11 फूट इतकी असून त्यामध्ये वाढ होवून उद्या 14 सप्टेबर 2021 रोजी साधारणपणे 25 फूटापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

सध्यस्थितीतीत धरणातील पाणीसाठा व विसर्गाची माहिती पुढीलप्रमाणे-

कोयना धरण आजचा पाणीसाठा 104.49 धरण भरलेली टक्केवारी 99.28, विसर्ग (क्युसेस) 38631,

वारणा धरण आजचा पाणीसाठा 34.36 धरण भरलेली टक्केवारी 99.88, विसर्ग (क्युसेस) 8205,

धोम धरण आजचा पाणीसाठा 12.41 धरण भरलेली टक्केवारी 91.93, विसर्ग (क्युसेस)620,

कन्हेर धरण आजचा पाणीसाठा 9.70 धरण भरलेली टक्केवारी 96.04, विसर्ग (क्युसेस)24,

उरमोडी धरण आजचा पाणीसाठा 8.75 धरण भरलेली टक्केवारी 87.85, विसर्ग (क्युसेस) 300,

तारळी धरण आजचा पाणीसाठा 5.54 धरण भरलेली टक्केवारी 94.70, विसर्ग (क्युसेस)3103धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहील्यास धरणामधील आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us