विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन

Connect With Us

नाशिक:  कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमावा , कर्मचार्‍यांना 6 व्या वेतन आयोगाचा फरक रक्कम व 7 वे वेतन आयोग लागू करावे. तसेच बाजार समितीचा भ्रष्टाचार , गैरकारभार व कर्मचार्‍यांवर होणारे अन्याय अश्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे  यांच्या वतीने नाशिक येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा  48 वा दिवस असून प्रशासनाकडून कुठल्याची प्रकारची दाखल घेण्यात आली नाही अश्या प्रतिक्रिया आंदोलकांनी  माध्यमांसमोर व्यक्त केल्या.

बाजार समितीच्या सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात तक्रारी केल्या असतांनाही बाजार समितीवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या आधी बाजार समितीच्या कर्मचार्‍यांनी आंदोलन केले असता त्यांना दिलेल्या आश्वासनांची कुठलीही पूर्तता केली नसून कर्मचार्‍यांची एकप्रकारे फसवणूकच केली आहे. तसेच आंदोलन मोडीत काढण्यासाठी बाजार समिती कडून आंदोलन सुरू असलेल्या काळातील कामाचे दिवस बिनपगारी करणे , रेकॉर्ड खराब करण्याच्या उद्देशाने पत्र देणे अश्या  वेगवेगळ्या मार्गाने आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे चे विभागीय उपाध्यक्ष नीलेश दिंडे यांनी दिली.

कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्या 

  1. कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी
  2. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीच्या कर्मचार्‍यांना नियमाप्रमाणे वेतन आयोग लागू करावे
  3. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचार्‍यांना 6 व्या वेतन आयोगाच्या फरक रकमेसह 7 वे वेतन आयोग लागू करावे
  4. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीस मा. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या 40 ( ई ) च्या निर्देशांचे पालन व्हावे
  5. अनुकंप तत्त्वावरील कर्मचार्‍यांना सेवेत समाविष्ट करण्यात यावे
  6.  बाजार समितीने सूड बुद्धीने सेवेतून कमी केलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यावरील कारवाई मागे घेण्यात यावी

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 

 

 

 


Connect With Us