लालबाग, परळमध्ये गणेशभक्तांना प्रवेश नाही ; मुंबई पोलिसांचा निर्णय

Connect With Us

मुंबई: अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनानं  उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. मुंबईत काळाचौकी, लालबाग आणि परळ याठिकाणी अनेक नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी केली जाते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरतीता लालबाग आणि परळ अशा ठिकाणी गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार नाही.

मुंबईत गणेशोत्सव धडाक्यात साजरा केला जातो.कोरोना विषाणू संसर्गामुळं उत्साहावर मर्यादा आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी गणेशभक्तांना लालबाग, परळ, काळाचौकी भागात गणेश भक्तांनी येऊ नये असं आवाहन केलं आहे. यंदा कोरोनामुळे भाविकांनी प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन न घेता फक्त ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे उत्सव कालावधीत लालबाग परळमध्ये राज्यातून येणाऱया भक्तांना याठिकाणी ‘नो एण्ट्री’ असणार आहे.

दरम्यान, मुंबईतील लालबाग, परळ आणि काळाचौकी या ठिकाणी मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. आर्कषक देखावा, उंच गणेशमूर्ती आणि इतर अनेक कारणांसाठी येथील अनेक नामांकित मंडळाच्या गणपतींना देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भक्तगण दर्शनाला येत असतात.

तसेच, कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही. जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us