मुलीनं केलं WhatsApp हँक; आईच्या प्रियकराला ब्लॅकमेल करत मागितली खंडणी!

Connect With Us

पुणे: एका व्यक्तीचे स्वतःच्या आईसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा पर्दाफाश करण्यासाठी 21 वर्षीय तरुणीने आईचे व्हॉट्सअॅप हॅक केले. त्यानंतर आईच्या प्रियकराला ब्लॅकमेल करत त्याच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्र्काऱ पुण्यात घडला आहे. या प्रकरणी सदर तरुणीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

त्या मुलीनं आई आणि तिच्या प्रियकराचे फोटो, व्हिडीओ मिळवले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याचं धमकावत 15 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिथुन मोहन गायकवाड ( वय 29, रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह एक 21 वर्षीय तरुणी आणि एका व्यक्तीवर विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली.

तक्रारदार व्यक्तीचे एका 40 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या महिलेच्या मुलीला या दोघांवर संशय होता. या दोघांचं प्रेम प्रकरण उघडकीस आणण्यासाठी या मुलीने स्वतःच्या आईचा व्हाट्सअप हॅक केलं. त्यावेळी तिला या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. व्हॉट्सअॅप हे केल्यानंतर तिला काही फोटो आणि व्हिडिओ देखील मिळाले होते.

त्यानंतर त्या मुलीने हा सर्व प्रकार तिच्या प्रियकराला सांगितला. त्यानंतर त्या दोघांनी मिळून आईच्या प्रियकराला तू जर आम्हाला १५ लाख रुपये दिले नाहीस तर तुझे फोटो आणि मेसेज सोशल माध्यमांत व्हायरल करु,अशी धमकी दिली. या धमकीमुळे तो घाबरला. आपली बदनामी व्हायला नको या कारणामुळे त्याने मे २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत २ लाख ६० हजार रुपये वेळोवेळी दिले. तरी देखील त्या दोघांकडून सतत पैशाची मागणी होत राहिली, सतत मानसिक त्रास देणे सुरूच राहिले.

त्या पीडित तरुणाने सर्व हकिकत पोलीसांना सांगितली. त्याच दरम्यान ३ सप्टेंबर रोजी पीडित तरुणाला १ लाख रूपयांची मागणी केली आणि हे पैसे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जवळ इथे देण्याचे ठरले. त्यानुसार आम्ही सापळा रचून ३ सप्टेंबर रोजी त्या मुलीच्या प्रियकराला,त्या मुलीला रंगेहाथ पकडले आहे. या दोघांना साथ देणारा आणखी एका मित्राचा शोध घेतला जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, पोलीस हवालदार मधुकर तुपसौंदर, संजय भापकर, रवींद्र फुलपगारे, प्रवीण राजपूत, अतुल साठे, मपोहवा हेमा ढेबे, पोलीस नाईक नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, अमोल आव्हाड, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विजय कांबळे, पोलीस शिपाई प्रफुल्ल चव्हाण आणि अमर पवार यांनी ही कारवाई केली.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us