नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेनंतर आता नाशिक पोलिसांनी लढवली ‘ही’ अनोखी शक्कल

Connect With Us

नाशिकः नाशिकमध्ये येत्या गुरुवारपासून (९ सप्टेंबर) कडक हेल्मेट सक्ती  मोहीम राबवण्याचा निर्धार पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा विविध अपघातांमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शहर पोलिसांनी नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेनंतर आता अनोखी शक्कल लढवली आहे. हेल्मेट वापरण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गुरुवार पासून पोलीस विनाहेल्मेट दुचाकीचालकाचे वाहन ताब्यात घेण्यात येणार असून, चालकांना पोलीस वाहनातून ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे समुपदेशनासाठी नेले जाणार आहे. विशेष म्हणजे, या पार्कमध्ये दोन तासांचे समुपदेशन पूर्ण केल्यानंतर चालकास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच वाहन सोडले जाणार आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले.

मात्र, हेल्मेटधारकांनी या मोहिमेलाही फाटा दिला. फक्त पेट्रोल घेण्यापुरते पेट्रोल पंपावरच हेल्मेट घालणे सुरू केले आहे. हे चित्र पाहता येत्या गुरुवारपासून हेल्मेट सक्ती मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे. त्यामुळेच या टप्प्यात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांना केंद्रावर नेत त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 


Connect With Us