“फार्मासिस्ट” ची ओळख आजही पडद्या मागेच : फा. रोहित वाघ
“फार्मासिस्ट”
फार्मासिस्ट कोण असत? फार्मसिस्ट कोणाला म्हणतात? फार्मासिस्टचे काम काय असते?
आपण जर आजची परिस्थिती पाहिली तर असे बरेच प्रश्न असतात ? बर्याच लोकांना हे माहित नसते की फार्मासिस्ट कोणाला म्हणतात किंवा त्यांचे काम काय असते?
सायन्स शाखेतील एक क्षेत्र म्हणून फार्मसी कडे बघितलं जातंअन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या माणसाच्या मूलभूत गरजा असतात त्याच प्रमाणे आरोग्य हें ही एक महत्वाची गरज बनली आहे. फार्मासिस्ट एक अशी व्यक्ती आहे जी फार्मास्युटिकल उद्योगात औषधे तैयार करने, उत्पादित करने, औषधे विक्रेता व औषधनिर्माणशास्त्रज्ञ या प्रकारचे कार्य हें फार्मासिस्ट करतात.त्याच वेळी एक आरोग्य सेवा व्यावसायिक औषध वितरित करण्यामध्ये तसेच परवानाधारक औषधांचा वापर, पर्यायी प्रशासन आणि आहार कसा घ्यावा, औषधं बदल माहिती, स्पष्टीकरण देण्या देखील फार्मासिस्टचे काम असते .
फार्मासिस्ट आपल्या संबंधित डॉक्टर, फार्मसी टेक्निशियन (परवानाधारक आरोग्य सेवा प्रदाता) मध्ये देखील कार्यरत आहेत!
फार्मासिस्ट हॉस्पिटलच्या फार्मसीमध्ये बर्याच वेगवेगळ्या कामाच्या वातावरणात, कम्युनिटी फार्मसी मध्ये काम करतात.
त्याचप्रमाणे, फार्मसिस्ट प्राथमिक देखभाल संस्था, लष्करी, पशुवैद्यकीय फार्मसी संस्था, विद्यापीठांमध्ये अध्यापन आणि संशोधनात देखील कार्यरत आहेत.
औषधे फार्मासिस्ट कडूनच का घ्यावी?
असे म्हणतात की औषधे फार्मासिस्टकडून घ्यावीत, तर तुम्ही म्हणाल फार्मासिस्ट कडूनच का घ्यावी?तर फार्मासिस्टला औषधांबद्दल माहित असते ! फार्मासिस्ट आपल्या आरोग्याबद्दल आपल्याला योग्य सल्ला देऊ शकेल,रूग्णांना देण्यात येणाऱ्या औषधं त्याची गुणवत्ता, निर्धारित औषधे रुग्णांसाठी योग्य आहेत याची खात्री करुन? किंवा नाही?रुग्णांना औषधांविषयी सल्ला देणे, त्यांना कसे घ्यावे, त्याची प्रतिक्रिया काय असू शकतेफार्मासिस्ट ही सर्व माहिती चांगल्या प्रकारे देऊ शकतात, इतर आरोग्य व्यावसायिकांना प्रभावी औषधांचा वापर, औषधांचा सुरक्षित आणि सुरक्षित पुरवठा याबद्दल सुद्धा माहिती फार्मासिस्ट कडून मिळते.
> रोहित मारुती वाघ , फार्मासिस्ट , नाशिक
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/