सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत ; थोड्याच वेळात अंत्यसंस्कार
मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत पोहोचले आहे. थोड्याच वेळात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अनेक टीव्ही कलाकार स्मशानभूमी परिसरात दाखल झाले असून सिद्धार्थची मैत्रीण आणि अभिनेत्री शहनाज गिलही अंत्यदर्शनाला आली आहे.
सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. मात्र त्यावरुन डॉक्टरांमध्ये मतभेद असून कुठलाच अंतिम निष्कर्ष काढला गेला नसल्याची माहिती आहे.
बिग बॉस १३चा विजेता असलेल्या सिद्धार्थ शुक्लाचे (काल गुरुवारी) निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती . वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे.
दरम्यान, सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री त्याने कोणते तरी औषध घेऊन तो झोपला होता असल्याची माहिती काही मीडिया अहवालात देण्यात आली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/