तालिबानची नजर आता काश्मीरवर!
नवी दिल्ली ; तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तिथे अनेक घडामोडी घडल्या, अफगाणी नागरीकांची अक्षरशा: धांदळ उडाली, देश सोडून जाण्यासाठी नागरिकांनी विमानतळावार केलेली गर्दी आणि ती दृश्य हृदयद्रावी होती. त्यातच तालिबानने आता काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे. “आमच्याकडे काश्मीरमधील मुस्लिमांचा आवाज उचलण्याचा अधिकार आहे.”, असं वक्तव्य तालिबान प्रवक्ता सुहैल शाहिन याने केले आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबान प्रवक्ता सुहैल शाहिन याने काश्मीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे तालिबानचं वक्तव्य भारतासाठी चिंता वाढवणारं आहे.
“कोणत्याही देशासोबत सशस्त्र लढा देण्याचा आमचा हेतू नाही. मुस्लिम असल्याने भारताच्या काश्मीर किंवा इतर कोणत्याही देशातील मुस्लिमांच्या बाजूने आवाज उचलण्याचा अधिकार आहे. आम्ही आवाज उठवू आणि सांगू मुसलमान तुमचे लोक आहेत. देशाचे नागरिक आहेत. कायद्यानुसार समान आहेत.”, असं प्रवक्ता सुहैल शाहिन यांनं एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
यापूर्वी तालिबाननं काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा असून हस्तक्षेप करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. भारत आणि पाकिस्ताननं आपल्या अंतर्गत लढाईसाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये, असं तालिबानी नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझई यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. तसेच तालिबानला शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध हवे असल्याचं देखील सांगितलं होतं. तालिबानचे भारतासोबत संबंध कसे असतील? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तालिबानचे नेते स्टेनिकझई यांनी माध्यमांमध्ये अनेकदा काही गोष्टी चुकीच्या येत असतात, असं सांगितलं होतं.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/