व्हॉट्सअॅपची सर्वात मोठी कारवाई; 30 लाख भारतीय अकॉउंटसवर बंदी
नवी दिल्ली : WhatsApp ने 30 लाखांपेक्षा जास्त भारतीय युजर्सचे अकॉउंट बॅन केले आहेत. सोशल मीडिया अॅप्स कंपन्यांसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे इथले युजर्स टिकवून ठेवण्यासाठी या कंपन्या स्वतःला सातत्याने अपडेट ठेवत असतात. पण आता व्हाॅट्सअॅप कंपनीकडून ३० लाख भारतीयांचे व्हाॅट्सअॅप खात्यांवर बंदी घालण्यात आली. कंपनीला 16 जून ते 31 जुलै दरम्यान 594 तक्रारी रिपोर्ट करण्यात आल्या. त्यामुळेच व्हाॅट्सअॅप कंपनीने ही कारवाई केलेली आहे.
ही माहिती कंपनीच्या कम्प्लयांस रिपोर्टमधून समोर आली आहे. ही बंदी अपायकारक वागणुकीमुळे आणल्याची माहिती व्हॉट्सअॅप मेसेंजरने दिली आहे. व्हॉट्सअॅपवर नवीन माहिती आणि तंत्रज्ञान नियमावली लागू झाली आहे त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला कम्प्लयांस रिपोर्ट प्रसिद्ध करावा लागतो, त्यानुसार व्हॉट्सअॅपने आपला रिपोर्ट प्रकाशित केला आहे.
व्हॉट्सअॅपने आपल्या नियमावली अंतगर्त एकूण 30,27,000 अकॉउंट्स दीड महिन्यात बॅन केले आहेत. 16 जून पासून 31 जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे.
व्हाॅट्सअॅपने यापूर्वीही ज्या भारतीयांच्या खात्यांवर बंदी घालण्यात आल्या होत्या. त्यातील ९५ टक्केहून जास्त युजर्सवर बेकायदेशीररित्या व्हाॅट्सअॅप वापरल्याचा आरोप होता.जागतिक पातळीवर व्हाॅट्सअॅपने प्रत्येक महिन्यामध्ये सुमारे ८० लाख व्हाॅट्सअॅप युजर्सवर बंदी घालते. त्यातून बेकायदेशीर व्हाॅट्सअॅप वापरल्याचे कारण दाखून युजर्सची खाती बंद करण्यात आली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/